अहमदनगर : श्रीपाद छिंदमसह 11 जण नगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शिवद्रोही श्रीपाद छिंदम व त्याचा बंधू श्रीकांत छिंदम याच्यासह अकरा जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

एककाळ अहमदनगर महापालिकेत उपमहापौर राहिलेल्या श्रीपाद छिंदमने महापालिकेच्या एका कर्मचाऱ्या बरोबर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे तो राज्यभर टीकेचा विषय ठरला होता. श्रीपाद व श्रीकांत छिंदम यांच्यावर यापूर्वीच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

छिंदम बंधूंच्या विरोधात अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात सात गुन्ह्यांची नोंद आहे. यात मारहाण करून गंभीर दुखापत करणे, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, मालमत्तांचे नुकसान करणे आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. या दोघांना एक वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply