२१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे जोकोव्हिचचे लक्ष्य!; आज पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात किरियॉसचे आव्हान

लंडन : सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद खुणावत असून रविवारी विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचे आव्हान असेल.

अग्रमानांकित आणि सलग तीन वेळा गतविजेत्या जोकोव्हिचला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. त्याने अपेक्षित कामगिरी करताना सहापैकी तीन सामन्यांत मानांकित खेळाडूंना पराभूत करत सलग चौथ्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली. आता त्याचा सातव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे, आक्रमक वृत्तीचा किरियॉस प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्याने हा टप्पा गाठताना स्टेफानोस त्सित्सिपाससारख्या आघाडीच्या खेळाडूवर मात केली, तर उपांत्य फेरीत राफेल नदालने माघार घेतल्याने त्याला पुढे चाल मिळाली. मात्र, आता जोकोव्हिचला नमवून पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी त्याला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. या दोघांमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत किरियॉसने बाजी मारली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *