“हर घर तिरंगा अभियानात सहभाग घ्या”; ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या ९१ व्या भागातून हर घर तिरंगा अभियाना सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. ‘मन की बात’चा आजचा भाग विशेष आहे. कारण यंदा आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. हे महान भाग्य देवाने आपल्याला दिले असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.

शहीद उद्यम सिंह यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले, “आजच्या दिवशी आपण सर्व देशवासी, शहीद उद्यम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

अमृत ​​महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरुप

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरुप मिळाल्याचे बघून मला आनंद होत आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोक या महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. स्वातंत्र्याच्या संघर्षात भारतीय रेल्वेचे योगदान सगळ्यांना कळावे यासाठी आझादीची रेल्वे आणि रेल्वे स्टेशन नावाच उपक्रम केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. झारखंडचे गोमो जंक्शनचे आता नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो मध्ये नामांतरण करण्यात आले आहे. या स्थानकावर कालका मेलमध्ये चढून ब्रिटिश अधिकाऱ्यांना चकमा देण्यात नेताजी सुभाष यशस्वी झाले होते. देशभरातील २४ राज्यांमध्ये अशा ७५ रेल्वे स्थानकांची ओळख पटली आहे. या ७५ स्थानकांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली असून यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.

१० वी १२ वीच्या परिक्षेत य़श संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

काही दिवसांपूर्वी देशभरात १० वी आणि १२ वीचे निकालही जाहीर झाले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे मोदींनी अभिनंदन केले आहे. ज्यांनी आपल्या परिश्रम आणि समर्पणाने यश संपादन केले आहे. महामारीमुळे गेली दोन वर्षे अत्यंत आव्हानात्मक होती. या परिस्थितीत तरुणांनी दाखवलेले धैर्य आणि संयम अत्यंत कौतुकास्पद आहे. या सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्यावर मोठी जबाबदारी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होत असलेल्या या सर्व कार्यक्रमांचा सर्वात मोठा संदेश हा आहे की आपण सर्व देशवासियांनी आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पाळले पाहिजे. तरच आपण त्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करू शकू. त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवता येईल. म्हणूनच आपला पुढील २५ वर्षांचा हा अमृतकाळ प्रत्येक देशवासियांसाठी कर्तव्यकाळ आहे. आपल्या शूर सैनिकांनी ही जबाबदारी आपल्याला दिली आहे आणि ती पूर्ण करायची असल्याचा निश्चय पंतप्रधांना यावेळी व्यक्त केला आहे.

पीव्ही सिंधू, नीरज चोप्राला शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक करताना पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा अभिनंदन केले आहे. शालेय वर्ग असो की क्रीडांगण, आज आपले युवक प्रत्येक क्षेत्रात देशाचा गौरव वाढवत आहेत. या महिन्यात पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनचे पहिले विजेतेपद पटकावले आहे. नीरज चोप्रानेही आपली उत्कृष्ट कामगिरीसह जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी रौप्य पदक पटकावले. आमचा ऍथलीट सूरजने ग्रीको-रोमन स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत त्याने भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. खेळाडूंसाठी हा संपूर्ण महिना कर्तृत्व गाजवणारा ठरला असल्याचे म्हणत मोदींनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे.

मध उत्पादनात भारत अग्रेसर

आपल्या पारंपारिक आरोग्य शास्त्रात मधाला किती महत्त्व दिले जाते. आयुर्वेद ग्रंथात मधाचे अमृत म्हणून वर्णन केले आहे. मध केवळ चवच देत नाही तर आरोग्यही देते. आज मध उत्पादनात इतक्या शक्यता आहेत की शिक्षण घेणारे तरुणही यातूनच आपला स्वयंरोजगार बनवत आहेत. तरुणांच्या मेहनतीमुळे आज देश इतका मोठा मध उत्पादक बनत आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की देशातून मधाची निर्यातही वाढली आहे.

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर तिरंगा फडकवा

आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा एक भाग बनून तुम्ही १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply