हंगामाची सुरूवात होण्यापूर्वीच धोनीने अचानक कॅप्टन्सी सोडली

महेंद्रसिंग धोनी याने इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजाला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती दिली. धोनी एक खेळाडू म्हणून संघाशी जोडला जाईल. IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, चेन्नईने जडेजा राखून ठेवलेला सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला चेन्नईने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. तर संघाने एमएस धोनीला 12 कोटी रुपये दिले होते.

चेन्नई सुपर किंग्जने रिटेन्शन पॉलिसी राबवताना महेंद्रसिंह धोनीचे डिग्रेडेशन करण्यात आले होते. चेन्नई सुपर किंग्जने त्यावेळी रविंद्र जडेला 16 कोटी देऊन रिटेन केले होते. तर धोनीला 12 कोटी दिले होते. म्हणजे संघात धोनी हा दुसऱ्या पसंतीचा खेळाडू होता. तेव्हाच सीएसके आता नेतृत्व बदल करण्याच्या मानसिकतेत गेला असल्याचे स्पष्ट झाले होते.

हंगामाचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी होत आहे. सामन्याला दोन दिवस शिल्लक असतानाच धोनीने कॅप्टन्सी सोडल्याची माहिती समोर आली. सीएसकेने ट्विट करून याची माहिती दिली. तसेही धोनी आपल्या कारकिर्दिबाबतचा निर्णय असा अचानकपणेच घेतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील 15 ऑगस्टला अशीच अचानक निवृत्ती घेतली होती.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply