सौंदर्य खुलवण्यासाठी बेसन वापरता; पण ते वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

माणसाचा चेहरा सगळं काही सांगतो. चेहराच सौंदर्याचं प्रतीकही असतो. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य (Beautiful Face) खुलवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. त्यासाठी बाजारातले फेसवॉश, क्रिम आणि नाना तऱ्हेची उत्पादनं वापरली जातात. मात्र या उत्पादनांचा चेहऱ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. बरेचदा चेहऱ्यावर रॅश किंवा पुरळही उठतात. निसर्गानं दिलेल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी तितकंच नैसर्गिक आणि उत्तम काही मिळालं, तर ते प्रभावी ठरू शकतं. प्रत्येकाच्या घरातच असणारं बेसन अर्थात हरभरा डाळीचं पीठ (Gram Flour) चेहऱ्यासाठी उत्तम फेस वॉश (Besan) म्हणून काम करतं.

लहान बाळाला अंघोळ घालताना बेसनपीठ प्राकृतिक साबण म्हणून वापरलं जातं. बाळाच्या मऊ त्वचेला काही त्रास होऊ नये, त्याचवेळी स्वच्छताही राखली जावी, यासाठी बेसनाचा वापर केला जातो. आपल्या चेहऱ्याची त्वचाही मऊ आणि संवेदनशील असते. त्यामुळे त्यासाठीही बेसनपीठ उपयुक्त असतं.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर उपयुक्त

चेहऱ्यावरील टॅनिंग कमी (Reduce Tanning) करण्यासाठी बेसनाचा उपयोग होतो. उन्हामुळे चेहरा काळवंडतो. बाहेरच्या धुळीमुळेही चेहऱ्यावर काळे डाग पडतात. ते दूर करण्यासाठी बेसनपीठ चेहऱ्याला लावणं फायदेशीर ठरतं. बेसन दह्यात मिसळून ते चेहऱ्याला लावावं. त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल.

त्वचा एक्सफॉलिएट होते

रोज चेहऱ्यावर धूळ बसून चेहऱ्यावरील छोटीछोटी छिद्र बंद होतात. त्यासाठी चेहऱ्याला स्क्रब लावणं गरजेचं असतं. दही आणि बेसन एकत्र करून त्यानं चेहऱ्याला स्क्रबप्रमाणे घासलं, तर चेहऱ्यावरील छिद्र मोकळी (To Exfoliate Skin) होतात. मात्र याचा वापर रोज न करता आठवड्यातून दोन वेळाच करावा.

पिगमेंटेशन कमी होते

बेसनाने चेहरा धुतल्यानं चेहऱ्यावरील जास्तीचं तेल निघून जातं. चेहऱ्यावरील छोटेछोटे केसही गळून पडतात. पिगमेंटेशनही (चेहऱ्यावर गडद रंगाचे पॅचेस येणं) कमी होऊ लागतं. एक चमचा बेसनात एक चमचा हळद मिसळून त्यानं चेहरा धुतल्यास हे शक्य होतं.

ओपन पोर्सवर फायदेशीर

काही जणांच्या चेहऱ्यावर खड्डे पडलेले असतात. बेसनामुळे चेहऱ्यावरील ओपन पोअर्स अर्थात छोटेछोटे खड्डे भरण्यासाठी मदत होते. त्यातील घाण काढून टाकायलाही बेसन मदत करतं. बेसनात पाणी घालून त्याची पेस्ट करा. ती चेहऱ्यावर लावून दोन मिनिटं ठेवा आणि मग हलक्या हातानं गोल गोल फिरवून चेहरा स्वच्छ धुवून टाका.

चेहरा उजळतो

बेसनामुळे चेहरा उजळतो. अनावश्यक तेल चेहऱ्यावर राहत नाही. चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्याही कमी होण्यास मदत होते. बाजारातील फेस वॉश चेहऱ्याचं क्लेन्झिंग अर्थात चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात. त्याऐवजी घरातील बेसन नैसर्गिक क्लेन्झर म्हणून वापरता येऊ शकतं.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply