सोलापूर : नियम मोडल्याने जप्त केलेल्या ३० वाहनांचा होणार लिलाव

सोलापूर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना जागेवर दंड केला जातो. मात्र जे मालक दंड व वाहनांचा थकीत कर भरत नाहीत अशा वाहनांवर जप्तीची कारवाई केली जाते. सध्या सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जप्त केलेली ३० वाहने लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच सोलापूर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम मोडलेल्या वाहनांवर दंड केला जातो. त्याचबरोबर वाहने जप्त केली जातात. यात अनेक छोट्या- मोठ्या वाहनांचा समावेश आहे.

असेच चित्र आरटीओ कार्यालयातील आवारात वाहने धूळखात पडून आहेत. वाहन मालकांना दिलेल्या कालमर्यादेत दंड व कर न भरल्यास संबंधित वाहने लिलावाद्वारे विकण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. जप्त केलेल्या छोट्या-मोठ्या व अवजड वाहनांच्या विक्रीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इ-निविदा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वर्षभर वाहन तपासणी मोहीम सुरू असते. काही कारवायांत संबंधित वाहनधारकांना दिलेल्या नोटिशीत दंड आकारणी करण्यात येते. तसेच वाहन सक्तीने जमा करण्यात येते. दोन वेळा नोटिसा बजावूनही दंडाचा भरणा न केल्यास कायदेशीर बाबींची पूर्तता करून वाहनांची वर्षभरानंतर ई-टेंडरिंगद्वारे विक्री करता येते. काही महिन्यांपूर्वी आरटीओत जप्त करण्यात आलेल्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना जागेवर दंडाची पावती दिली जाते किंवा संबंधित वाहन जप्त करून नोटीस बजावून दंड भरण्याची सूचना दिली जाते. केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड न भरल्यास सोडून देता येते, परंतु उल्लंघनासह वाहनाचे करही भरत नाहीत ती वाहने दंड व कर भरल्याशिवाय सोडण्यात येत नाहीत. सहा महिन्यांपर्यंत त्यांना मुदत दिली जाते. त्यानंतर वाहन विक्री करण्यात येते. ही प्रक्रिया राबविण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मुदतीनंतर वाहनांचा लिलाव सुरू असताना संबंधित वाहनमालक आला व दंड व कराची रक्कम भरण्यात आली तर वाहन पुन्हा वाहन मालकाला परत दिले जाते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांवर दंड केला जातो. मात्र दंड न भरल्यास वाहने जप्त केली जातात. दंड आणि कराची रक्कम न भरल्यास अशी वाहने लिलाव प्रक्रियेद्वारे विकली जातात. सध्या अशा प्रकारच्या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply