सीबीआयची मोठी कारवाई; Videocon कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक

बँक कर्ज फसवणूक (Bank Fraud) प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांना अटक केली आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर आता वेणुगोपाल धूत यांनाही अटक झाली आहे.

सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. धूत यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिल्याचा आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या नु रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली.

व्हिडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचे बँक कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे दीपक कोचर यांना अटक केली होती. यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. 

२०१२ मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेद्वारे लोन देण्यात आलं होतं. हे प्रकरण नंतर एनपीए झालं. २०२० मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली. २०१२ मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला ३२५० कोटींचं कर्ज दिलं.त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटींचं लोन दिलं. या कंपनीत दीपक कोचर ५० टक्के भागिदारी होती.

आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉनचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि आयसीआयसीआय सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांच्यावर एकमेकांची बाजू घेत असल्याचा आरोप केला. धूत यांच्या कंपनी व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये पैसे गुंतवले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply