सिमेंटची विट डोक्यात घालून दारू दुकानातील व्यवस्थापकाचा खून

पुणे: देशी दारूच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्याच्या डोक्यात सिमेंटची विट घालून खून करण्यात आला आहे. काल दुपारी सिंहगड रस्ता परिसरातील देशी दारूच्या दुकानात ही खून केल्याची घटना घडली आहे. दिनकर सूर्यभान कोटमाळे (वय ४०, रा. चरवड वस्ती, वडगाव पठार) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी तौशिब रफिक शेख (वय २४) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी शेख हा दारू पिण्यासाठी दुकानात आला असता त्याचे कोटमाळे यांच्याशी वाद झाले. या वादातून आरोपीने तेथे असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली. तसेच गळा दाबला असल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे. हल्ल्यात कोटमाळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *