सासवड मध्ये प्लास्टिक कचऱ्याची होळी करत महाविद्यालयात सण साजरा

सासवड ( ता. पुरंदर ) : येथील वाघीरे महाविद्यालयात होळीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'स्वछता अभियान' राबविण्यात आले. सदर स्वछता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान करून महाविद्यालय परिसराची स्वछता करून जैविक व प्लाष्टीक कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा करुन प्लाष्टीक कचऱ्याची होळी करीत विद्यार्थ्यांनी होळीसणाला दिली वेगळी दिशा. यावेळी प्लाष्टीक न वापरण्याचा संकल्प सर्व स्वयंसेवकांनी केला.यानिमित्ताने प्लाष्टीक कचऱ्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता अभियान राबविण्यात आले. हे अभियान यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम आधिकारी डॉ. विशाल पावसे, प्रा. अनिल झोळ, प्रा.समीर कुंभारकर, प्रा. भाग्यश्री मद्भाविकर यांनी प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ तसेच डॉ. नाना झगडे, प्रा. दत्तात्रय संकपाळ, प्रा. किरण गाढवे, प्रा.भानुदास गायकवाड व एम. जी. जगताप उपस्थित होते.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply