सांगली :  कार्तिकी वारीनंतर पंढरीत कचऱ्याचे साम्राज्य ; निर्धार फाऊंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांकडून सफाई

सांगली: कार्तिकी वारीनंतर पंढरीच्या विठ्ठल भेटीनंतर लाखो वारकरी आपापल्या गावी परतले. मात्र, मागे राहिलेला कचरा, अस्वच्छता दूर करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाऊंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांनी चंद्रभागा तीरी झाडलोट करीत सुमारे ३ टन कचरा एका दिवसात संकलित केला.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पार पडत असलेल्या वारीला महाराष्ट्र व इतर राज्यातून लाखो वारकरी बांधव सहभागी होत असतात यावेळी अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच पांडुरंगाचे चरणी एक वेगळ्या पद्धतीने भक्ती अर्पण करावी व प्रशासनाला सहकार्य या दोन्हीच्या हेतूने निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी सांगलीची स्वच्छता वारी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारी ही अनोखी मोहीम हाती घेतली.या मोहीमेत तब्बल शंभरहून अधिक स्वच्छता दूत सहभागी झाले होते.

वारीनंतर रविवारी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व आभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले यांनी उपलब्ध करून दिलेल्या दोन एसटी बसमधून सांगलीतील १०० पंढरीच्या स्वच्छतेसाठी रवाना झाले होते. सकाळी अकरा  ते सायंकाळी चार या वेळेत चंद्रभागा नदीकाठी असलेल्या घाटावर निर्माल्य,  माती, चिखल, जुने कपडे, फोटो पसरलेेले होते. स्वच्छता दूतांनी हा घाट परिसर स्वच्छ केला. यासाठी नगरपालिकेनेही जेसीबी व कंटेनरची व्यवस्था मदतीसाठी उपलब्ध करून दिली होती. लक्ष्मण नवलाई,भारत जाधव,योगेश कापसे यांनी स्वच्छता दूतांसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली. या अभियानात भारत जाधव, अपर्णा कोळी, भारत पाटील, मेघा मडीवाळ, वर्षा जाधव, निलेश लोकरे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, अनिरुद्ध कुंभार, सचिन ठाणेकर, रोहीत कोळी, सविता शेगुणशी, मनोज नाटेकर, प्रथमेश खिलारे, मानतेश कांबळे आदिंसह सहकार्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply