पुणे – ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांची उचलबांगडी

पुणे - देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणं समोर येतात. अनेक वेळा किडनी तस्करीसाठी अपहरण, तसेच हत्या झाल्याचंही समोर आलं आहे. महाराष्ट्रातही किडनी तस्करीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेच्या किडनी तस्करी प्रकरणी राज्य सरकारने दुसरी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांची उचलबांगडी केली आहे.

गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या अधीक्षक पदावर कार्यरत होते. कोल्हापूरच्या सारिका सुतार ह्या विधवा महीलेची पुण्यातली रूबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी ट्रासंप्लांटसाठी किडनी काढून घेण्यात आली होती. डॉक्टर अजय तावरे हे अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावर कार्यरत होते.

सारिका सुतार महिलेला किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी देण्यास सांगून 15 लाख रुपये देण्याचे आमिष देण्यात आले होते.किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने सारिका सुतार यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. हा सर्व प्रकार प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये घडला होता. त्यानंतर आता पोलिसांनी ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांची उचलबांगडी केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply