सर्व धार्मिक सण, कार्यक्रमात स्पिकर लावण्यासाठी घ्यावी लागणार पोलिसांची परवानगी

मुंबई: महाराष्ट्राचे डीजीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे तासभर बैठक झाली. कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक सणांसाठी स्पिकर लावण्यापूर्वी सर्वांना परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परिस्थितीनुसार नियमांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य पोलिस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलिस अधिकारी यांना दिले आहे. लवकरच डीजीपी कार्यालयाकडून एक सामान्य मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल जी संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल. जिल्ह्यातील परिस्थिती पाहून नियम कठोर किंवा सौम्य ठेवण्याचे नियम बैठकीत ठरवण्यात आले आहे. 

राज्यात ३ मे नंतर विस्फोटक स्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांच्या गोपनीय अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे चं अल्टिमेटम दिलंय. त्यामुळे, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गृह खात्यानं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक सणांसाठी स्पिकर लावण्यापूर्वी सर्वांना परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परिस्थितीनुसार नियमांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य पोलिस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलिस अधिकारी यांना दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply