सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी – मद्रास HC

चेन्नई - सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत वैयक्तिक वापरासाठी मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देऊ नये, असा निर्णय आज मद्रास उच्च (High Court) न्यायालयाने दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम यांनी तामिळनाडू सरकारला याबाबत नियम बनवण्यास सांगितले आहे. या निकालबाबत मद्रास उच्च न्यायालयाने (Madras HC) तामिळनाडू सरकारला सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत वैयक्तिक वापरासाठी मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देऊ नये आणि या संदर्भात नवीन नियम बनवून आदेश द्या, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही याबाबत एक आदेश जारी केला होता. देशातील पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्यास सांगितले होते. कार्यालयीन वेळात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले होते. राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यास मोबाइल फोनचा वापर करावा असं या आदेशात सांगण्यात आलं होतं.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply