संभाजीराजे छत्रपती : ‘एसटी कर्मचाऱ्यांचे आजचे आंदोलन अशोभनीय, राज्याचे असे संस्कार नाहीत’

पुणे : "एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. मात्र, कर्मचाऱ्यांनी आज ज्या पद्धतीने आंदोलन केले ते अशोभनीय असून महाराष्ट्र राज्याची ही संस्कृती नाही," अशा शब्दात भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 8) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घराबाहेर आंदोलन केले. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी येथे घोषणाबाजी करून गोंधळ घातला. याबाबत संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले, "आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु, आंदोलन करताना कायदा हातात घेतला जाऊ नये. एसटी कर्मचाऱ्यांकडून ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले ते अशोभनीय आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. राज्याचे असे संस्कार नाहीत. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या बाजूने आहोत."



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply