संजय राऊतांच्या घरात ‘ईडी’ला सापडलेल्या नोटांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव

शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली.  राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. ईडीला राऊत यांच्या घरी सापडलेल्या रोख रक्कमेसंदर्भातही एक मोठा खुलासा समोर आल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. डीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार जप्त करण्यात आलेल्या या रक्कमेपैकी १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

एकूण ११ लाख ५० हजार रुपये राऊत यांच्या घरामध्ये सापडले. त्यापैकी १० लाख रुपयांचे नोटांचे बंडल असणाऱ्या कव्हरवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदार, खासदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र यासंदर्भातील खुलासा करताना राऊत यांनी हे पैसे शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी बाजूला काढण्यात आल्याचा दावा केल्याचंही या वृत्तात म्हटलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply