“संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा”, भाजपा नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

महाविकास आघाडीने अलीकडेच मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिंदे गट व भाजपाच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलल्या आक्षेपार्ह विधानांच्या निधेषार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत लोकांनी पाठिंबा दिल्याचा दावा, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिवारी या मोर्चाचा उल्लेख ‘नॅनो’ मोर्चा असा केला.

यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,” असा टोलाही राऊतांनी लगावला.

पण हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चातील असल्याचा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आला आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी यावरून संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे. संजय राऊतांनी मराठा समाज, मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाचा अपमान केला आहे. उद्धव ठाकरेंनी राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी लाड यांनी केली. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओत प्रसाद लाड म्हणाले, “संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सातत्याने मराठा समाज, मराठा मोर्चा, मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आज संजय राऊतांनी प्रत्येक गोष्टीचे उंबरठे पार केले आहेत. कालचा महाविकास आघाडीचा ‘नॅनो’ मोर्चा किती मोठा होता? हे दाखवण्याचा प्रयत्न करताना संजय राऊतांनी मराठी मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करण्याचं वाईट काम केलं आहे. त्यामुळे माझी तुमच्याकडे मागणी आहे, तुम्ही तत्काळ मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची माफी मागितली पाहिजे. संपूर्ण समाजाला धारेवर धरण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे.”



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply