श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘फिरोदिया’चे विजेतेपद

पुणे : फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचे विजेतेपद ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘भूत मारीच्या’ या सादरीकरणाने पटकावले. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) ‘ओ माय सेपियन’ने द्वितीय क्रमांक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘पिनी’ने तृतीय तर विश्वकर्मा इन्सिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे ‘विष्णूदासा’ने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. शनिवारी बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात रंगलेल्या अंतिम फेरीत एकूण नऊ संघांनी सादरीकरण केले होते. यामध्ये पारितोषिकप्राप्त संघांसह सर परशुरामभाऊ महाविद्यालय, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघांचा समावेश होता. या संघांच्या सादरीकरणानंतर निकालाची घोषणा करण्यात आली. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक अभिजित पानसे आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर मिलिंद ओक यांनी काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरवारी (ता. २४) सायंकाळी चार वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती संयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी दिली.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply