श्रीलंका-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : श्रीलंकेचे चोख प्रत्युत्तर

पीटीआय, गॉल : कर्णधार दिमुथ करुणरत्ने (१६५ चेंडूंत ८६ धावा) आणि कुसाल मेंडिस (१५२ चेंडूंत नाबाद ८४) यांच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले.

श्रीलंकेची दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १८४ अशी धावसंख्या होती आणि ते १८० धावांनी पिछाडीवर होते. करुणरत्ने आणि मेंडिस यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १५२ धावांची भागीदारी रचली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला. स्टीव्ह स्मिथ १४५ धावांवर नाबाद राहिला, परंतु त्याला तळाच्या फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. श्रीलंकेकडून डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने सहा बळी मिळवले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *