श्रीनगर :  अमरनाथ गुंफेनजीक ढगफुटी ; यात्रातळावरील १५ जणांचा मृत्यू, ४० जण बेपत्ता; मदत-बचाव कार्य सुरू

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुंफेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात १५ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत.

अमरनाथ गुंफेच्या परिसरात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाली. प्रचंड पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालयांचे नुकसान झाले असून तेथे बचाव मदतकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती निवार दल, राज्य आपत्ती  निवारण दलाचे जवान तसेच  पोलीस आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी या कामात सहभागी झाले आहेत. इंडोतिबेटियन सीमा पोलिसांचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. सायंकाळी प्रथम हे वृत्त मिळाले, तोवर  दोन जणांचा मृत्यू झाला होता.

एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, ढगफुटीच्या या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असावा, पण त्याबाबत आताच निश्चित असे काही सांगता येत नाही,  अशी माहिती इंडोतिबेटियन पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *