शिवसेनेचे सर्व आमदार येणार अडचणीत ? विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी बजावल्या नोटीस

मुंबई: शिवसेनेच्या आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांना विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ७ दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांना व्हीप बजावला होता. आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा एकमेकांनी केला होता, आता या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.

बहुमत चाचणी दरम्यान, शिवसेनेत  एकनाथ शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून व्हीप बजावण्यात आला होता. यानंतर दोन्ही बाजूने आपला खरा पक्ष असल्याचा दावा केलेा होता, तर दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. या संदर्भात विधी मंडळाने शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस पाठवली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंद-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे, मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिवसेना पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांत बदल करण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल कोकीळ मुंबईतील शिवडीतले नगरसेवक आहेत. कोकीळ हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply