शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यावं; राऊतांचे संभाजीराजे आणि उदयनराजेंना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जात आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही या अवमाना विरोधात एकत्र यावं, असं संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती किंवा उदयनराजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. महाविकास आघाडीने सातत्याने या विषयावर आवाज उठवायचं काम चालू ठेवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याबाबत एक अल्टिमेटम दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपाकडून ज्या पद्धतीने अपमान केला जात आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत, या सगळ्याच्या विरोधात आपण एकत्र यायला हवं. मला वाटतं की लवकरच त्याबाबत कठोर पावलं उचलण्याबाबत निर्णय होईल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरही तोंडसुख घेतलं आहे. ते म्हणले की माझ्या माहिती प्रमाणे नवी मुंबईत आसाम भवन आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्या राज्यांना जागा हवी आहेत. पण महाराष्ट्राला कधी कोणी जागा देणार आहे का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली वर दावा करत आहेत. गुजरात आमचे उद्योगधंदे पळवत आहे. हे सरकार महाराष्ट्रातलं जे आहे ज्याला खोके सरकार म्हणून देशात मन्यता मिळालेली आहे त्याचं आणि आसामचं अचानक निर्णम झालेलं नातं काय आहे? असा सवाल त्यांनी केला.

आसामचे मुख्यमंत्री हे तसे मूळचे काँग्रेसवाले. तेही पक्षांतर करूनच भाजपात गेले आणि मुख्यमंत्री झाले. आत्ताचे आपले मुख्यमंत्रीही त्याच पद्धतीचे. त्यामुळे दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल. पण मुंबईत आता जागा नाही. असा चिमटा काढतानाच नवी मुंबईत आसाम भवन आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांना कामाख्या मंदिराच्या दर्शनाला बोलावलं असा या आमदारांचा दावा आहे. आम्हाला कधी बोलवलं नाही. कारण आम्ही पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवी न्याय देवता आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की कामाख्या देवी नक्की न्याय करेल”, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply