शिवजयंतीत तणाव! शिवप्रेमी-पोलिसांमध्ये बाचाबाची; नेमकं काय घडलं? VIDEO

image

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये महाराणा प्रताप चौक येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि काही शिवप्रेमी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवजयंतीनिमित्त चौकात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या परिसरात शांतता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *