शिर्डी : साई चरणी ४६ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठे दान

शिर्डी : नवीन वर्षाची सुरूवात होताच अनेक भावीकांनी साई दर्शनासाठी गर्दी केली आहे. बेंगलोरच्या एका कुटुंबाने साई चरणी ४६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साई चरणी दान केला आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना हा मुकुट सुपुर्त करण्यात आला आहे. (Latest Shirdi News)

बेंगलोर येथील साईभक्त राजा दत्‍ता आणि शिवानी दत्‍ता या दाम्पत्यानी नववर्षानिमित्त ९२८ ग्रॅम वजनाचा ४६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साईबाबांना देणगी स्वरूपात दिला आहे. दानशूर साईभक्ताच्या इच्छेखातर आज हा सुवर्ण मुकुट साई मूर्तीला परिधान करण्यात आलाय. या मुकूटावर अमेरिकन डायमंड असून ओमची छबी रेखाटण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून सईबाबांना सोन्याचे आभूषण देण्याचा राजा दत्ता आणि शिवानी दत्ता या दाम्पत्याचा मानस होता. सोने वितळवताना त्याचा आकार मुकूटासारखा झाल्याने ही बाबांची इच्छा समजून सुवर्णमुकूट बनवून तो दान दिल्याचे शिवानी दत्ता यांनी म्हटले आहे. सध्या या दाम्पत्याची सर्वत्र चर्चा होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply