शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलनामागे राजकीय शक्ती; गृहमंत्र्यांचा नेम कुणावर?

मुंबई: एसटीकर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. अचानक सुरु झालेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. एसटी कामगारांच्या प्रश्नांच्या अडून काही राजकीय शक्ती हे घडवत आहेत, अशी प्रतिक्रीया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

अतिशय आणि अचानक झालेली ही दुर्दैवी घटना आहे. निश्चित काळजीची घटना आहे. फेल्युअर कुठे झाले हे शोधून काढू. न्यायालयाने निर्णय दिला त्याचे स्वागत केल्या नंतर असा हल्ला केला गेला. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन दिलीप वळसे यांनी यावेळी केले.

एसटी कर्मचाऱ्यांना कोणी भडकविण्याचे काम करत असेल तर कारवाई केली जाईल. क्राईम कॉन्फरन्स होती त्यामुळे आम्ही सकाळ पासून तिथेच होतो. महिला आंदोलक अधिक असल्याने पोलिसांना त्यांना अडवता आले नाही. मी स्वतः सुप्रिया ताई यांच्याशी बोललो आहे. आता सगळे कंट्रोल मध्ये आले आहे असे देखील वळसे पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, काही अज्ञात शक्ती असे घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या चुका झाल्यात त्या तपासल्या जातील. कोण आंदोलक होते, खरेच आंदोलक होते हे तपासातून समोर येईलच. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे देखील वळसे पाटील म्हणाले. कायदा असला तरीही सहानुभूती म्हणून आम्ही आझाद मैदानात परवानगी दिली. न्यायालयाने विलीकरण शक्य नाही हे सांगून ही आंदोलन करणे चुकीचे आहे असे देखील ते म्हणाले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply