वेळ आली तर नरेंद्र मोदींवरही बोलेन – राज ठाकरे

मुंबई : आज शिवाजी पार्कवर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणामध्ये जे हिंदुत्वाबाबत मुद्दे घेतले होते त्यावर राज्यभारात अनेक राजकीय पक्षांनी आरोप केले त्या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी आज ठाण्यात उत्तर सभेचं आयोजन केलं होतं यावेळच्या सभेतील भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले.

आज दुपारी बसलो असतां पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला विचारलं त्याने किती वाजता निघणार आहेत? म्हटलं का ? तर म्हणके काही छोट्या संघटना तुमचा ताफा आ आडवणार आहेत म्हटलं माझा ? तर म्हणाले सगळ्यांना पकडू, फक्त वेळ कळवा म्हटलं निघतो , तेव्हा कळवतो. माझ्या ताफ्याला कोणी तरी आवडणार आहे हे इंटेलिजन्स कळलं मात्र, पवारसाहेबांच्या घरी एसटी कामगार जाणार हे नाही कळलं. खर तर त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांना ठाऊक असते असं म्हणत त्यांनी पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरुन प्रशासनावर शंका उपस्थित केली.

आज जाहीर सभा घेण्याच काय कारण ? खरं तर काहीच कारण नाही गुढी पाडव्याच्या सभा झाल्यावर अनेकांनी तारे तोडले अनेक राजकीय लक्षणचत पुढाऱ्यांनी तारे तोडले त्याच उत्तर द्यायला पाहिजे मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं, मग भाजपची स्क्रिप्ट होती म्हणत होते महाराष्ट्रआत अनेक गुणी पत्रकार आहेत,पण या भांत्या पत्रकारणमुळे दूर झालेत त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच म्हणणं यांनी खरडायचं. दोन वर्षांपूर्वी गुढी पाडव्याच्या भाषण काय झालं ते सांगतो

२०१९ पूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या होत्या. मोदींवर मी बोलत होतो ,काही उघड भूमिका घेत होतो. मला ईडीची नोटीस आली त्यानंतर मी ट्रॅक बदलला अशी माझ्यावर टीका करण्यात आली. मात्र, मी आजही माझा ट्रॅक बदलला नाही. कोहिनुरच्या एका कंपनीत मी भागीदार होतो. मात्र, वर्षभरात मी त्या कंपनीतून बाहेर पडलो. कारण त्यात फंद्यात मला पडायचे नाही. त्याच प्रकरणात मला ईडीकडून नोटीस आली होती. मी त्याच प्रकरणाशी संबंधीत ईडीच्या चौकशीला जाऊन आलो होतो. आता कोणी व्यवसायही करायचा नाही का?

बरं मी तेव्हा बोललो, मला मोदींच्या भूमिका मला नव्हत्या पटल्या पण त्याच मोदींची चांगली धोरण मला पटली 370 कलम हटवल्यावर मी पाहिलं ट्विट केलं असा पंतप्रधान हवा हे मी आधी बोललो असही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply