विद्यार्थ्यांनो, उशिरा याल तर परीक्षेस मुकाल

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. सकाळच्या सत्रात १०.३० तर दुपारी ३ वाजता अशी पेपरची वेळ आहे. आतापर्यंत १० मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. दहा मिनिटे उशिरा पोचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्या उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्‍नपत्रिकेत आलेला काही आशय आढळून आला होता. या बाबीची मंडळाने दखल घेऊन कारवाई केली. परंतु, या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाने मंगळवारी पत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे परीक्षा कक्षात हजर राहणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल.गैरप्रकारांवर प्रतिबंध घालण्यासाठी मंगळवारी बोर्डाने परिपत्रक काढले असून यापुढे परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देता येणार नसल्याचे मंडळाने कळविले आहे.  


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply