वाई : महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर घाटात ३८ कामगारांसह ट्रक कोसळला दरीत

वाई: महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर मुकदेव घाटात कोट्रोशी पुला जवळ कामगारांच्या टेम्पोला भीषण अपघात होऊन आडतीस कामगारांसह ट्रक  दरीत काेसळला. अपघातात महिला लहान मुलांसह अनेक कामगार जखमी झाले असून त्यात चौघांची प्रकृती अति गंभीर आहे. जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

 महाबळेश्वर  तापोळा रस्त्यावर टँम्पो मजुरांना कामावर  घेवुन जात असताना मुकदेव घाटात अवघड वळणावर टेम्पो दरीत कोसळला. टेमोतून ३८ प्रवासी कामावर जात होते. कोट्रोशी पुला जवळ मुकदेव घाटात हा अपघात महाबळेश्वर कडुन तापोळ्याकडे जाणा-या मार्गावर झाला. अपघात झाल्याचे समजताच ताबडतोब परिसरातील ग्रामस्थ आणि महाबळेश्वर प्रशासनाने बचावकार्य सुरु केले. सर्वांना बाहेर काढून महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक उपचारानंतर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे तांब (ता महाबळेश्वर) या ठिकाणी काम करण्यासाठी पुणे चाकण येथून चाळीस प्रवासी रस्त्याच्या कामासाठी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान बुरडाणी घाटामध्ये गाडीचे ड्रायव्हर प्रदीप खंडू कुरदने (वय २३) हे गाडी चालवत होते. गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान साधून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी तीनशे फूट खोल दरीत कोसळली. याच घाटामधून तळदेव येथील स्थानिक लोक प्रवास करत असताना त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे माहिती दिली.

स्थानिक लोकांच्या खाजगी वाहनातून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे घेऊन आले यामध्ये लहान अकरा मुले, दहा महिला, आठ पुरुष मजुरांची प्रकृती स्थिर असल्याकारणाने या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे ठेवण्यात आलेले आहे. तसेच ज्या लोकांचे प्रकृती जखमीची व अति जखमेची आहे अशा लोकांना प्राथमिक उपचार देऊन ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल करण्यात आलेले आहे. यामध्ये एकूण अकरा लोकांना पाठवण्यात आले यामध्ये दोन गर्भवती माता आहेत.

चार मजुरांची प्रकृती गंभीर आहे. महाबळेश्वर जावळी हा संपूर्ण भाग घाट रस्त्यांचा आहे.दरवर्षी महाबळेश्वर,पाचगणी, प्रतापगड, तापोळा येथे किमान वीस लाख पर्यटक येत असतात. नियमित होणाऱ्या अपघाता मुळे पर्यटकांवर उपचारासाठी महाबळेश्वर येथे अद्ययावत रुग्णालय असण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply