वयाच्या ७४ व्या वर्षी ‘लगान’ सिनेमातील मुखिया राजेंद्र गुप्ता झालेयत हताश

ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र गुप्ताअभिनय क्षेत्रात गेली जवळ-जवळ चाळीस वर्ष काम करीत आहेत. वयाची ७४ वर्ष झाली असली तरी आजही ते अभिनयक्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या मते आज जे मोजकेच ज्येष्ठ अभिनेते काम करीत आहेत त्यापैकी ते एक आहेत. नुकतचं त्यांना आपण 'जगन्नाथ और पुर्वी की दोस्ती अनोखी' मध्ये पाहिलं होतं. अभिनयक्षेत्रात होणारे बदल चांगल्यासाठी होत आहेत असं राजेंद्र गुप्ता यांचं म्हणणं आहे. जेव्हा टी.व्हीचं खाजगीकरणं होत होतं तेव्हाच्या आठवणीत रमताना राजेंद्र गुप्ता म्हणाले,''खूप बदलाचे दिवस होते ते. ते पाहून थोड वाईट वाटलं होतं,पण आता कुठून कुठे आलो आहोत आपण. जेव्हा खाजगी वाहिन्यांचं जग सुरू झालं तेव्हा मला वाटलं होतं मी इथे फीट बसत नाही. पण या खाजगी वाहिन्यांनी अभिनयक्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या,जास्तीत जास्त काम निर्माण झालं,फायद्याचं जग पहायला मिळालं. पण आता निर्मात्यांना,प्रॉडक्शन हाऊसेसना,वाहिन्यांना आमच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांची गरज नाही. त्यांना सिनेमासाठी नवीन चेहरे हवे असतात. त्यांना त्या नवीन चेहऱ्यांचे आकर्षण आहे. आणि काम दिलं आम्हाला तरी त्यांचं म्हणणं असतं आर्थिक तडजोड करा. मात्र मी कधीच यासाठी तयार झालो नाही. माझ्या तत्वात ते बसत नाही. मी सांगितलेला आर्थिक आकडा किंवा कामाची फी ऐकली की ते पुन्हा मला कॉल करत नाही. मला त्यावेळी वाईट वाटतं,पण कोणाकडे तक्रार करायची?'' नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचं शिक्षण घेतलेल्या राजेंद्र गुप्तांना वाटतं की ही तडजोड नं केल्यामुळेच निर्माते आणि आपल्यात दुरावा निर्माण झाला आहे. ते पुढे म्हणतात,''मी कामाच्या बाबतीत खूप व्यावसायिक मताचा आहे. तिथे मी भावनांना महत्त्व देत नाही. अन्यथा इतर वेळेस मी खूप मनमोकळा,मैत्रीपूर्ण संवाद साधणारा आहे. पैशाच्या बाबतीत कोणी मला फसवलं तर मला खूप त्रास होतो. किंवा कामाच्या बाबतीत माझं कुणी शोषण केलं तर मी दुखावलो देखील गेलोय. पण एक आहे,मी कधीच कामासाठी कुणाला स्वतःहून फोन केला नाही. समोरुन काम मिळत गेलं आणि मी ते करत गेलो''. लगान सिनेमात मुखिया म्हणून ओळखले जाणाऱ्य़ा राजेंद्र गुप्ता यांनी अनेक मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. पुढे ते म्हणालेयत,'' सिनेसृष्टीत गटबाजी चालते,आणि मी कोणत्याही गटात कधी सामिल झालो नाही. हो,पण मनात थोडं शल्य आहे की यामुळे मला सिनेमात कधी मोठी भूमिका ऑफर नाही झाली. सिनेमावाले नेहमी मला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी बोलावतात. आणि या गोष्टीचं मनाला खूप वाईट वाटतं. पण आता मी कशाचंच वाईट वाटून घेत नाही. तुम्ही जगाला बदलू शकत नाही''.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply