पुणे : लोणी काळभोरमध्ये इंधनाचा काळाबाजार; आणखी १२ टँकर जप्त ; इंधन चोरी प्रकरणात गुन्हे शाखेकडून सखोल तपास

पुणे : लोणी काळभोरमधील इंधन पुरवठा कंपनीतून बाहेर पडलेल्या टँकरमधील डिझेल, पेट्रोल परस्पर चोरुन त्याच्या विक्रीचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नुकताच उघडकीस आणला. पोलिसांनी आणखी १२ टँकर जप्त केले असून इंधनाच्या या काळाबाजार प्रकरणात सखोल तपास करण्यात येत आहे.

टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल मोजण्यासाटी दोन लोखंडी धातूच्या पट्ट्या (डिपराॅड) जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या धातूच्या पट्ट्या न्याय वैज्ञानिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. लोणी काळभोरमधील इंधन कंपनीतून बाहेर पडणाऱ्या टँकरमधील डिझेल आणि पेट्रोलची परस्पर चोरी करणारी टोळी सक्रीय असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. डिझेल आणि पेट्रोल चोरीचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर पुणे पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले आहे. या गुन्ह्याच्या तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply