लोणावळा : कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक; पोलीस निरीक्षकाचा सहभाग

लोणावळा ग्रामीण विभागातील पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्विकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे यांचाही सहभाग असल्याचं पुढे आलं आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे, सहायक उपनिरीक्षक कुतबुद्दीन गुलाब खान आणि यासिन कासम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आली. यापैकी, दीड लाख स्वीकारताना एसीबीने कूतबुद्दीनला बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय तक्रारदार यांची गॅस एजन्सी आहे. त्यावर कारवाई न करण्यासाठी लोणावळा ग्रामीणचे सहायक उपनिरीक्षक कुतबुद्दीन गुलाब खान याने त्यांच्याकडे दोन लाखांची लाच मागितली. तडजोड केल्यानंतर दीड लाख घेण्याच ठरलं. त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे प्रोत्साहन होते.  गुरुवारी आरोपी यांनी खरच लाचेची मागणी केली का याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर, शुक्रवारी सापळा लावून आरोपी यासिन कासम शेख यांच्याकडून पैसे स्वीकारताना कूतबुद्दीनला रंगे हाथ पकडण्यात आलं. या प्रकरणी दोघांना एसीबीने बेड्या ठोकल्या असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे हे फरार आहेत. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply