लातूर- उस्मानाबाद बसवर दगडफेक; दाेन महिला जखमी

उस्मानाबाद : एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर एसटीची सेवा पूर्वपदावर येत आहे. त्यातच उस्मानाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने साेमवारी रात्री बसवर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने बसमधील प्रवासी घाबरले हाेते. या घटनेत दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत.

उस्मानाबाद शहरातील एम.आय.डी.सी.परिसरात लातूरहून आलेल्या बस क्रमांक एमएच २० बीआय ०८६० यावर साेमवारी रात्री नऊ वाजता दगडफेक झाली. या बसमध्ये २० प्रवासी हाेते.

त्यापैकी दाेन महिला प्रवाशांना काचा लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. लातूर- उस्मानाबाद बसवर दगडफेक का करण्यात आली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *