तामिळनाडू : लाँग ड्राईव्हवर प्रेयसीसोबत भांडण अन् डॉक्टरने पेटवली 40 लाखांची मर्सिडीज कार,

तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाँग ड्राईव्हवर गेलेल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये भांडण झाले. 28 वर्षीय डॉक्टर प्रियकराने रागाच्या भरात त्याची मर्सिडीज बेंझ कार रस्त्यातच थांबवली, खाली उतरून गाडीला आग लावली. मर्सिडीज बेंझची किंमत सुमारे 40 लाख रुपये होती. कारला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. इकडे गाडी जळत राहिली आणि दोघांमध्ये भांडण वाढत गेले. 

दरम्यान, स्थानिकांनी पोलिसांना माहिती घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांनाही पोलिस स्टेशनला आणले. डॉक्टरची नंतर पोलीस ठाण्यातून जामिनावर सुटका करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मपुरी येथील 28 वर्षीय काविनने गेल्या वर्षी कांचीपुरममधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले आहे. डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर त्यांने खासगी रुग्णालयात नोकरी करण्यास सुरुवात केली. त्याच महाविद्यालयातील त्यांची एक मैत्रीण आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघे सोबत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काविन आणि त्याची मैत्रीण कांचीपुरम आणि आसपासच्या भागात फिरायला गेले होते. त्यानंतर राजाकुलम गावातील एका तलावाजवळ त्यांनी कार थांबवली. दोघांमध्ये चर्चा सुरू असतानाच काही गोष्टीवरून वाद झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काविनने रिकामी बाटली काढली आणि कारमधून पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली. पेट्रोल काढून गाडीवर ओतून गाडी पेटवून दिली.

गाडी जाळताना मैत्रीणीने कविनला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने रागाच्या भरात तिचे ऐकले नाही. रस्त्याने जाणाऱ्यांनी अग्निशमन दल आणि बचाव दलाला माहिती दिली आणि एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, कांचीपुरम तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून काविनची पोलीस ठाण्यातून जामिनावर सुटका केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply