लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’चा नारा

पुणे - लंडनच्या संसद चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ब्रिटेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी ‘जय शिवरायां’च्या घोषणांनी संसदभवन परिसर दणाणून सोडले.

लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठ, सोयास विद्यापीठ आणि लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांनी हा जयंती उत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रम आयोजन समितीत ॲड.संग्राम शेवाळे, ओंकार कोकाटे, धैर्यशील काळे, विनायक गर्जे, ऍड.दिपक चटप आणि डॉ.ऋषिकेश आंधळकर आदींचा सक्रीय सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत छत्रपतींना अभिवादन केले.

ॲड. शेवाळे म्हणाले, ‘‘आपल्या युद्ध कला आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्य यांमुळे शिवाजी महाराज हे आदर्श राजे ठरले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. जगभरातील युवकांना त्याची प्रेरणा मिळावी म्हणून लंडनच्या संसद चौकात हे आयोजन करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply