
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गटात टीका टीप्पणी सुरू असताना यावरून आता मनसेही आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. अशाच भारत जोडो यात्रा उद्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचणार आहे. याठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी आता राज्यभरातील मनसैनिकांना शेगाव पोहोचण्याची निर्देश राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती पुढे आहे. यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“राहुल गांधींकडून ज्या पद्धतीने स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न होतो आहे. हे कोणाला न पटण्यासारखं आहे. हे कुठं तरी थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे उद्या राज्यभरातून मनसैनिक हे शेगाव येथे पोहोचणार आहेत. यावेळी त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा निषेध नोंदवू. मनसेची निषेध नोंदवण्याची एक पद्धत आहे. यावेळी केवळ काळे झेंडे आम्ही दाखवणार नाही, आमचा निषेध कसा असतो, हे उद्या शेगावमध्ये सर्वांना बघायला मिळेल”, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
“आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. मात्र, तुम्ही तोंडावर ताबा ठेवणार नसाला, तर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही महाराष्ट्रात येता आणि आमच्या महापुरुषांबाबत वाटेल तो बोलता, हे आम्ही सहन करणार नाही. तुम्ही अशाप्रकार सावरकरांचा अपमान करणार असाल, तर निश्चितपणे तुम्हाला धडा शिकवला जाईल”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून भ्रमण करते आहे. दरम्यान, मंगळवारी ही यात्रा वाशिमध्ये असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. “सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात होते. यावेळी त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली होती. तसेच सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे”, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


