रायगड : अखेर जिल्ह्यातील 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका थांबली

पाली : नियमित वेतन, कोरोना काळातील बोनस आणि पगारवाढीसाठी रायगड जिल्ह्यातील १०८ क्रमांक रुग्णवाहिका (Ambulance stops) चालकांनी गेल्या महिन्यात संबंधित विभागाला निवेदन दिले होते. मात्र यावर २१ दिवसांनंतरही कोणताच तोडगा न निघाल्याने बुधवारी (ता.६) सायंकाळपासून जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी  बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले.

रायगड जिल्ह्यातील १०८ क्रमांकाच्या २३ रुग्णवाहिका असून ५५ रुग्णवाहिका चालक आहेत. हे रुग्णवाहिका चालक (पायलट) २०१४ पासून बीव्हीजी इंडिया कंपनीमध्ये कंत्राटी रुग्णवाहिका चालक म्हणून कामावर रुजू आहेत. २०१४ पासून आजपर्यंत किमान वेतनात एकही रुपयाची वाढ झालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्यांसंदर्भात कोणतेच निर्णय झाले नाहीत. त्यामुळे अखेर रुग्णवाहिका चालकांसमोर काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही. दरम्यान, काम बंद आंदोलन सुरू केलेले असले तरी हे रुग्णवाहिका चालक गर्भवती आणि अपघातग्रस्तांना सेवा देणार आहेत.

रायगड जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आमच्या मागण्यांचा विचारही केला नाही. आम्ही अजूनही आमच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेस तयार आहोत.

 ज्ञानेश्वर जगताप, उपाध्यक्ष, १०८ रुग्णवाहिका संघटना, रायगड.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply