राज्यातील ५५ गावांचा गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा; नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील गावकऱ्यांची आज बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असतानाच आता एक नवं संकट समोर ठाकलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील अनेक गावांनी कर्नाटाकात सामील होण्याचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील काही गावांनी गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा दिलेला आहे. नाशिकच्या सुरगणा जिल्ह्यातील सुमारे ५५ गावांनी गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सुरगाणा तालुक्याच्या ५५ गावातील आदिवासी गावकऱ्यांची याबाबत आज बैठक होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकऱ्यांची आज बैठक होणार आहे. आदिवासी भागात सोयी सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातला जोडा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागाच्या ५५ गावातील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत.

याबाबत आंदोलकांची दिशा ठरवण्यासाठी आज महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पांगारगण गावात ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधील आदिवासी गावांना सर्व सोयी-सुविधा, तर महाराष्ट्रात मात्र आदिवासी बांधव सोयी सुविधांपासून वंचित असल्यानं या गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील आदिवासी बांधवांनी आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी ही नवी कलुप्ती शोधली आहे.

याआधीच अक्कलकोटआणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल अठ्ठावीस गावाच्या सरपंच अन् ग्रामस्थ्यांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली हाेती. त्यासाठी तडवळ भागातील ग्रामस्थांनी कर्नाटकच्या समर्थनात घोषणाबाजी देखील केली हाेती. या ग्रामस्थांवर पाेलिसांची आता करडी नजर आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply