राज्यसभा निवडणूक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत झाले बाद; कायदेशीर लढा देण्याचा निर्णय

राज्यसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीचे तीन भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.दुसरीकडे भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यामुळे हा विजय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे यश असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निवडणुकमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मतं ग्राह्य धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. कांदे यांचे मत बाद झाल्यामुळे संजय राऊत यांचा निसटता विजय झाला. ते पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये काठावर पास झाले आहेत.

मत बाद ठरवण्यात आल्यानंतर सुहास कांदे कायदेशीर लढाई देणार आहेत. तसे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. त्यामुळे आगामी काळात सुहास कांदे न्यायालयात आपली बाजू कशी मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन तर भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांचा विजय झाला. तर भाजपाचे डॉ. अनिल बोंडे, पीयुष गोयल आणि धनंजय माहडिक विजयी झाले. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply