Rajpal Yadav : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि ‘भूल भुलैया’ चित्रपटातील छोटा पंडित या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असून सुनावणीदरम्यान न्यायालयाने राजपाल यादवला कडाडून फटकारले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘सहानुभूतीला तिचे स्थान आहे. मात्र कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे’. न्यायालयाने हेही नमूद केले की, सुरुवातीला दिलेल्या आदेशानंतर राजपाल यादवने आत्मसमर्पण केले नाही. मात्र, न्यायालयाकडून दुसऱ्यांदा आदेश जारी झाल्यानंतरच तो तुरुंगात हजर झाला.
शिक्षा रद्द करण्यावर न्यायालय काय म्हणाले?
न्यायालयाने राजपाल यादवला थेट प्रश्न विचारला की, ‘तुम्ही शिक्षा रद्द करण्याची मागणी करत आहात? जेव्हा तुम्ही स्वतः पैसे उधार घेतल्याची कबुली दिली आहे. गुन्हा मान्य करून पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिक्षा झाली मग आता शिक्षा स्थगित करण्याची मागणी का करत आहात? त्यावर वकिलांनी सांगितले की, ‘आम्ही सुरुवातीपासूनच हे प्रकरण सेटल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझ्या क्लायंटने आपल्या शब्दांचे पालन करण्यासाठी आत्मसमर्पण केले आहे. चित्रपटात गुंतवलेली सुमारे 5 कोटी रुपयांची रक्कम परत देण्याचा त्यांचा मानस आहे. आतापर्यंत 3 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलंं.
राजपाल यादवने दाखल केलेल्या जामीन अर्जावर तक्रारदाराकडून अद्याप उत्तर दाखल करण्यात आलेले नाही. याबाबत न्यायालयाने तक्रारदाराला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, ‘तुम्हाला तुमचे उत्तर दाखल करावेच लागेल. फाइल पाहताना अनेक अशा बाबी समोर आल्या आहेत ज्या यापूर्वी आमच्या निदर्शनास नव्हत्या. न्यायालयाने हेही नमूद केले की, राजपाल यादवने याआधीचा आदेश सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र तेथे त्याला कोणतीही दिलासा मिळालेला नाही.
पुढील सुनावणी सोमवारी
सुनावणी पुढे ढकलण्यापूर्वी राजपाल यादवच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ‘मी माझ्या मुवक्किलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो झाला नाही. जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर विरोधी पक्षाचे उत्तर अपेक्षित आहे. त्यामुळे कृपया ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करावी. त्या वेळी मी संपूर्ण तयारीसह न्यायालयात हजर राहीन असं ते म्हणाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


