दिल्लीत एआय शिखर परिषदेदरम्यान यूथ काँग्रेसच्या‘शर्टलेस’ निषेधाने तशाच प्रतिक्रिया निर्माण केल्या,ज्याची अपेक्षा केली जाऊ शकत होती. काहीमिनिटांतच सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातीलवाहिन्यांनी त्या दृश्यावर आपला निकाल सुनावला की,हा निषेध भरकटलेला, अस्वस्थ करणारा आणि अगदीराष्ट्रीय शरमेचा विषय आहे. वैयक्तिकरीत्या, मीदेखीलएका मोठ्या जागतिक परिषदेच्या संदर्भात याला योग्यसमजत नाही. पण लोकशाहीतील चर्चा अशाचप्रकारच्या असहमतीवर आधारित असतात. प्रत्येकनिषेध विवेकपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येक घोषणाप्रभावी नसते. अनेकदा तर निषेधाचा उद्देश केवळ लक्षवेधून घेणे हा असतो. जसे की काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटलेदेखील की- जर आम्ही या शैलीत निषेध केला नसता तर कोणत्याही वाहिनीने आम्हाला प्रसिद्धी दिली नसती! यूथ काँग्रेसचे ते प्रदर्शन अनुचित, अगदीबेजबाबदारदेखील वाटू शकते. परंतु आपण हे लक्षातठेवले पाहिजे की एखादा निषेध नापसंत करणे म्हणजे शांततापूर्ण निषेधाचा अधिकारच अवैध ठरवण्यासारखे आहे. याच कारणामुळे जेव्हा दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अजामीनपात्र कलमांतर्गत अटक केलीआणि त्यांच्यावर देशाविरुद्ध कारस्थान रचल्याचाआरोप लावला. हा सर्व प्रकारच्या निषेधांना इशारादेण्यासारखे होते. दिल्ली पोलिस त्याच कार्यपद्धतीचाअवलंब करत आहेत. त्यानुसार कलम 144 चा वापरसार्वजनिक सभा रोखण्यासाठी केला जात आहे. सार्वजनिक जीवनातील लोकशाहीची जागा आधीचसंकोचू लागली आ हे. विरोधी पक्षाच्या नेत्याला संसदेतबोलू दिले जात नाही. स्वतः संसददेखील सरकारचीविधेयके रेटून मंजूर करण्याचे साधन बनत चाललीआहे. सत्तेत असलेल्या पक्षाला गैरसोयीचे प्रश्नविचारले जात नाहीत. विद्यापीठ परिसरांवर कडकपाळत आहे. पर्यायी दृष्टिकोनाची अभिव्यक्ती‘राष्ट्र-विरोधी’ ठरवली जाते. नागरी समाजही सत्तेलाआव्हान देण्यास कचरू लागला आहे. परंतु केवळविवेकबुद्धी असलेल्या लोकांनाच बोलण्याची परवानगीअसावी. अशी काही लोकशाही व्यवस्था नसते. तीआवाज उठवण्याच्या, गैरसोयीचे ठरण्याच्यास्वातंत्र्याचेही रक्षण करते. लोकशाही प्रगल्भतेची खरीकसोटी ही नाही की आपण ज्या निषेध-प्रदर्शनांशीसहमत असतो त्यांच्याशी कसे वागतो, तर ही आहे कीआपण त्या प्रदर्शनांवर कशी प्रतिक्रिया देतो, ज्यांनाआपण स्वतः त्रासदायक किंवा निरर्थक मानतो. पणशासनाची वृत्ती सहसा याच्या उलट असते. एखादानिषेध वाहतुकीस अडथळा आणत असेल, एखाद्याकार्यक्रमात व्यत्यय आणत असेल किंवा यंत्रणेलाअस्वस्थ करत असेल, तर त्यावर प्रशासकीय प्रतिक्रियातत्काळ उमटते. या कारवाईचा उद्देश सार्वजनिकव्यवस्थेपेक्षा जनमत व्यवस्थापनाचा अधिक असतो. .भारताचा स्वतःचा इतिहास पुरेसे इशारे देतो. 1970 च्यादशकातील जेपींचे आंदोलनदेखील अराजक आणिबेजबाबदार ठरवण्यात आले होते. परंतु त्यावरराज्यसत्तेच्या कठोर प्रतिक्रियेनेच (आणीबाणी) शेवटीत्याला परिभाषित केले. असहमतीला अव्यवस्थासमजून लोकशाही स्वतःला मजबूत करू शकत नाही.पण आपण हे कथानक नजीकच्या भूतकाळात वारंवारपाहिले आहे: भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, नागरिकत्वकायद्याच्या विरोधातील प्रदर्शने, शेतकऱ्यांचे आंदोलन-यापैकी प्रत्येकाला तिखट टीकेचा सामना करावालागला आहे. परंतु लोकशाहीच्या वैधतेसाठी हेआवश्यक आहे की असहमतीचा अधिकार कायमराहावा. तसेही लोकशाही हे नेहमीच प्रतीकात्मकतेचारंगमंच राहिला आहे. काळ्या फिती, उपोषण, मूकमोर्चा, पथनाट्य- निषेधाच्या अभिव्यक्ती सहसासुव्यवस्थित किंवा सौंदर्यपूर्ण नसतात. 2004 मध्येमणिपूरच्या 12 महिलांनी आसाम रायफल्समुख्यालयासमोर कशा प्रकारे विवस्त्र होऊन प्रदर्शन केलेहोते. त्या कृत्याने तेव्हा मणिपूरमधील संकटाच्यागांभीर्याबद्दल पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. ‘शर्टलेस’ प्रदर्शन बालिश नक्कीच म्हटले जाऊ शकते,पण त्याला राष्ट्रीय शरमेचा दर्जा देणे ही अतिशयोक्तीआहे. भारतीय गणराज्य इतके कमकुवत नाही की एकाप्रदर्शनानेच त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. शोकांतिकातर ही आहे की, सरकारे अनेकदा एखाद्या निषेधावरअतिरेकी प्रतिक्रिया देऊन त्याला अधिक प्रसिद्धीचमिळवून देतात.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एक आत्मविश्वासू लोकशाही जिथे यागोष्टीचा स्वीकार करते की सार्वजनिकव्यवस्था महत्त्वाची आहे, तिथेच तीसंयमाचे महत्त्वही जाणते. निषेधावरनजर ठेवणे ही एक गोष्ट आहे आणिअसहमतीला गुन्हा ठरवणे दुसरी.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

