रमजान सुरू आहे म्हणून… पण ३ तारखेला तयारीत राहा’, राज ठाकरेंचे आदेश

राज्यातील मशिदींच्या भोंग्यांवरून मनसेने मैदानात उडी घेतली आहे. येत्या ३ तारखेपर्यंत हे भोंगे न हटल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. ठिकठिकाणी सार्वजनिक पद्धतीनेहनुमान चालीसा पठण मनसेच्या वतीने करण्यात येणार आहे. 

ठाण्यातील उत्तर सभेनंतर राज ठाकरे यांनी लगेच पुण्याकडे कूच करत राजकीय घडी बसवण्याचा प्रयत्न केला. पुण्यात येताच हनुमान जयंतीला त्यांनी महाआरती केली. यानंतर त्यांनी पुण्यात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच सामाजिक अँगलने या विषयाकडे पाहण्याचं आवाहन केलंय. आत्ता रमजान सुरू असल्याने मी शांत आहे. पण ते संपल्यावर तीन मे रोजी तयार राहा. माझ्या सर्व मनसैनिकांनाही तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधत त्यांनी टीका केली. यावर प्रश्न विचारल्यानंतर लवंड्यांवर मी काही बोलणार नाही असा टोला ठाकरेंनी लगावला. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. लोकांनी त्याच अंगाने त्याकडे पहावं, असं ते म्हणाले.

या देशातील संविधान, न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयापेक्षा यांना धर्म महत्वाचा वाटत असेल तर त्यांना याच पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे. राज्यात मला दंगली नकोत. कोणताही राडा नकोय. पण स्पीकरच्या भूमिकेवर ठाम असाल तर आमच्या आरत्याही तशाच पद्धतीने ऐकायला लागतील, असं ठाकरे म्हणाले.पाच वेळा भोंगे लावणार तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. आमच्या मिरवणुकांवर हल्ला होतो. मग आमच्या हातातही दगड घ्यायला लावू नका. आमचे हात बांधलेले नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply