रत्नागिरी : मेडीकल कोर्सला प्रवेश देण्याची बतावणी; 15 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक

रत्नागिरी : दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. खोटी कारण देऊन ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी येथे घडला. मेडिकल कोर्सला प्रवेश मिळवून देतो असे सांगत चक्क १५ लाख १० हजार रुपयांना चुना लावत फसवणूक केली आहे. याप्रकरणी महेश विठ्ठल अदाते (42, रा.कसपटे वस्ती, ता.वाकड जि.पूणे) या संशयित इसमाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वैद्यकिय कोर्समध्ये प्रवेश करुन देण्याचे आमिष दाखवत डॉक्टराकडून ऑनलाईन पध्दतीने सुमारे 15 लाख 10 हजार रुपये घेउन फसवणूक केली. या प्रकरणातील संशयिताला रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली असून बुधवारी त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या विरोधात डॉ. अमोल वासुदेव झोपे (वय 39, रा.पर्णिका एंपायर आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.

 
You May Like


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply