यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त, IT कडून धडक कारवाई

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली.मुंबई महापलिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं.

यानंतर राजकीय वातावरणही तापलं. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. त्यानंतर यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावली आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आणि परिवाराच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झालीय. जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याचं कळतंय. यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply