यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश: यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांवर काळाचा घाला पडला आहे. मृत व्यक्ती पुण्यातील रहिवासी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात जीपमधील एक पुरुष, चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. 

यमुना एक्स्प्रेस वेवरून ते नोएडाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. या घटनेत अपघातग्रस्तांची ओळख त्यांच्या आधारकार्डवरून पटली आहे. या एक्सप्रेस वेवर अपघाताच्या मालिका सुरूच आहेत. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

गेल्या आठवड्यात देखील यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident) एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक हरदोई येथून नोएडा येथे एका लग्नाला जात होते. त्यावेळी कॉल रायडर्स माइलस्टोन ६८ जवळ गाडी पोहोचली असता, एका अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply