सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा तिढा कायम आहे. मात्र भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासोबत महाविका आघाडीची बैठक झाली असून, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत आता महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गट अशी नवी आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तसे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देखील देण्यात आले आहेत.
सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा कायम आहे, जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपानं महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला गृहीत धरून मॅजिक फिगर 31 असल्याने सत्तेचा दावा केला आहे, त्यामुळे महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल,असं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट देखील करण्यात आलं आहे.
मात्र दुसरीकडे सांगली जिल्हा परिषदेमध्ये वेगळचं चित्र पहायला मिळत आहे. भाजपला सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच शिवसेना शिंदे गट देखील प्रयत्नशिल असल्याची माहिती समोर येत आहे. तशा दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीच्या सत्तेचं समिकरण
भाजपा 11, शिवसेना शिंदे गट 07, राष्ट्रवादी अजित पवार गट 06, जनसुराज्य शक्ती पक्ष 01 आणि रयत क्रांती संघटना 01, हे सर्व सदस्य मिळून 31 चा आकडा गाठला जात आहे, मात्र अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार का? असा प्रश्न आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट 18, काँग्रेस 11, शिवसेना ठाकरे गट 01, राष्ट्रवादी अजित पवार गट 06 आणि शिवसेना शिंदे गट 07 अशी एकूण सदस्यांची संख्या ही 43 वर पोहोचत आहे. त्यामुळे आता निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


