मैत्रीण फक्त त्याच्याशीच बोलते म्हणून तरुणाला दगडाने ठेचले; मृतदेह नदीत फेकला

पुणे - आमची मैत्री तुझ्याशी बोलते आमच्याशी बोलत नाही म्हणून एका तरुणाचे अपहरण करून त्याला दगडाने ठेचून त्याचा मृतदेह शेल पिंपळगाव येथील नदीत टाकून देण्यात आल आहे. कृष्णा रेळेकर असं खून झालेल्या 18 वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. सात-आठ आरोपी आणि दोन संज्ञान आरोपींनी मिळून कृष्णाची निर्घृण हत्या केल्याने मोशी परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अविनाश पिसे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मोशितील शिवाजी वाडी येथून आरोपींनी कृष्णाचं अपहरण केलं होत. कृष्णाच्या अपहरणाची माहिती मिळताच त्याच्या आईने भोसरी पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली होती.

भोसरी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला असता. सात - आठ अल्पवयीन आणि दोन संज्ञान आरोपींनी कृष्णाची निर्घृण हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. या तील सर्व आरोपींची एक कॉमन मैत्रीण असून ती सर्वांशी न बोलता फक्त कृष्णासोबतच बोलत होती. याचा राग मनात धरून आरोपींनी कृष्णाचा खून केल्याचं उघडकीस आला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Follow us -



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply