मुंबई : ५० जणांपैकी एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडेन: एकनाथ शिंदे

मुंबई: आज मुंबईत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संदिपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. आम्ही बंडखोरी केली तेव्हा अनेकांनी आमच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्या, आम्ही ५० आमदास निवडून येणार नसल्याचे ते म्हणाले, पण मी सांगतो या ५० आमदारांपैकी एकही आमदार पराभूत झालातर मी राजकारण सोडून देईन, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आता शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघात एकही काम शिल्लक राहणार नाही हा विश्वास आहे. मी सुरू केलेले ऑपरेशन नेहमी पूर्ण होत असते. सुरुवातीला मी छोटे मोठे ऑपरेशन करायचो. हे मोठे ऑपरेशन होते. त्यामुळे मलाही काळजी होती. मी त्यावेळी झोपत नव्हतो. मला माझे टेन्शन नव्हते पण या ५० आमदारांच्या करिअरचे टेन्शन होते. तरही आम्हाला कामाखे देवीनेही आशीर्वाद दिले आहेत. कामाखे देवीकडे ५० बळी गेले म्हणत, बळी कोणाचा घेतला कामाखे देवीने ही सर्वांनी पाहिले आहे, असा टोलाही एखनाश शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *