मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या मैत्रिणीसह तीन नराधमांना अटक

मुंबई : येथील विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन नराधमांनी ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर विरार पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेवून पीडित मुलीच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेला तिच्या एका मैत्रीणीने अज्ञात स्थळी नेऊन तिच्या तीन मित्रांना बोलावलं. त्यानंतर त्या तीन नराधमांनी पीडितेवर बलात्कार केला. या धक्कादायक प्रकाराबाबत पीडित मुलीनं तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांना या गंभीर घटनेबाबत माहिती दिल्यानंतर आरोपींना पोलिसांनी गजाआड केले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply