
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. अशातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. दुसरीकडे भाजपने देखील आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. अशातच देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 1 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सत्तास्थापन करण्यासाठी अधिक वेळ दवडणार नाहीये. विशेष बाब म्हणजे जर उद्या बहुमत चाचणी झाली तर ती चाचणी महाराष्ट्रातील जनतेला लाईव्ह पाहता येणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी उघड मतदान होणार असून गुप्त मतदान होणार नाही असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 39 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचं संख्याबळी कमी झालं असून त्यापैकी 16 आमदारांवर पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. यासंदर्भातील खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आमदार अपात्रतेसंबंधी याचिकेचा निर्णय लागेपर्यंत बहुमत चाचणी अर्थात फ्लोअर टेस्ट घेऊ नये, अशी मागणी मविआतर्फे करण्यात आली होती.
मात्र कोर्टानं ती अमान्य करत, बहुमत चाचणीत काही पेचप्रचंग उद्भवल्यास तुम्ही कोर्टात दाद मागू शकता, असे म्हटले होते. बंडखोर आमदारांच्या परतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ठाकरे सरकारला अचानकपणे फ्लोअर टेस्टला सामोरे जावं लागणार, यातील काही पेचप्रचंगांवरून ठाकरे सरकार कोर्टात धाव घेऊ शकते.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत आहे तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

