मुंबई : सध्या माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही, पण...; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

मुंबई : आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु तुमची ताकद मला हवी आहे. सध्या तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करत असताना भाजपासह शिवसेनेतून बंड करून निघालेल्या आमदारांवर टीका केली. तसेच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हानही दिले. सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशापद्धतीने घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची माहिती दिली.

एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेश सारखा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी बोलताना त्यांचे मन भावुक झाले होते. त्या म्हणाल्या की 'यापुढे आपण एक जुटीने व ताकतीने काम करायचे आहे.' ऊद्धव ठाकरेंची भेट व त्यांची साद यांनी पुण्याच्या शिवसैनिकांना जिंकले आहे.

दरम्यान, ठाणे, कल्याण सारख्या भागातील अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे आमदारांसोबत माजी नगरसेवक देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे शिवसेनेला या राजकीय संकटातून उभारी मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply