मुंबई :  संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई, ईडीकडून मालमत्ता जप्त…

मुंबई : ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने थेट कारवाई केली आहे. अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. संजय राऊतांसोबत संपर्क साधला असता, ते म्हणाले मला कुठलाही फोन केलेला नाही. मला नोटीस दिलेली नाही. मी दिल्लीत असून मला याबाबत काहीही माहिती नाही.

१ हजार ४८ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई -

ईडीने १ हजार ४८ कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. तसेच मुंबईतील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे. आता संजय राऊत देखील ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

किरीट सोमय्यांचे संजय राऊतांवर आरोप -

संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आले आहे, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. त्यानंतर राऊतांच्या कुटुंबीयांवर ईडीची छापेमारी झाली होती. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याबाबत स्वतः संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply